राज्य सरकार मराठा समाजात फूट पाडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:40+5:302021-06-09T04:16:40+5:30

पिंपळगाव बसवंत : राज्य सरकारमध्ये विसंवाद असून, सरकारमधील काही घटक समाजात फूट पाडत आहेत. सरकारमधील प्रत्येक जण स्वतंत्र भूमिका ...

The state government is dividing the Maratha community | राज्य सरकार मराठा समाजात फूट पाडतेय

राज्य सरकार मराठा समाजात फूट पाडतेय

Next

पिंपळगाव बसवंत : राज्य सरकारमध्ये विसंवाद असून, सरकारमधील काही घटक समाजात फूट पाडत आहेत. सरकारमधील प्रत्येक जण स्वतंत्र भूमिका मांडत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पिंपळगाव बसवंत येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर झालेल्या बैठकीत यांनी संवाद साधला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे स्वतंत्र आंदोलन न करता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनासंदर्भातील विसंगती दूर होऊन प्रश्‍न सुटेल. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले १६ जूनपासून कोल्हापूरपासून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. आरक्षणासाठी समाजातील सर्व संघटना, नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन सामूहिक नेतृत्व करावे व त्या व्यासपीठावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावे, तसेच त्यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली जाणार आहे. सर्वांशी समन्वय साधण्यासाठी आठ दिवसांत बैठक घेणार आहोत. आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनात सहभागी होताना पक्षीय राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, नानासाहेब बोरस्ते, सतीश मोरे, केदा आहेर आदी उपस्थित होते. (०८ पिंपळगाव १)

Web Title: The state government is dividing the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.