मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 07:16 PM2019-12-29T19:16:11+5:302019-12-29T19:41:06+5:30

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

The state government does not have transparency like Modi: Devendra Fadnavis | मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही : देवेंद्र फडणवीस

मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अटी शती लादून शेतकऱ्यांची फसवणूकराज्य सरकारवर केली टीकाबेळगाव मधील मराठी माणसाबरोबरच राहणार

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजना पारदर्शी असून त्यात अटी शर्ती नाहीत. मात्र सात बारा कोरा करू, सरसकट कर्ज माफी देऊ असे सांगणाऱ्यांनी महाराष्टÑात शेतक-यांसाठी अटी शर्ती लादून फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये केली.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यमान भारत ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी शर्ती नसतात. मात्र राज्यातील सरकारे मात्र एक लाख रूपयांत बंगला आणि खाली अटी शर्ती लागू अशा स्वरूपाच्या योजना करू लागले आहेत. निवडणूकीत शेतकºयांन सरसकट कर्ज माफी देऊ, सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर अटी शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकºयांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही असे सांगितले गेले मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष आपले सरकार केंद्रात जाऊन आपल्या नावावर किती नुकसान आहे, ते बघा,ते मान्य असेल तर अपलोड करा अशा प्रकारच्या अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही कर्जमाफी पुर्णत: फसवी आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बेळगाव मधील मराठी माणसाच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असे स्पष्ट केले. आणि नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुदैवी आहे. योजनेविषयी शंका असतील तर त्या समजावून घ्या परंतु नाशिककरांचे नुकसान करू नका असेही ते फडणवीस म्हणाले.

Web Title: The state government does not have transparency like Modi: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.