लसीकरणाच्या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:40+5:302021-05-11T04:15:40+5:30
पवार यांनी म्हटले आहे, आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ८ मेपर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण ...
पवार यांनी म्हटले आहे, आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ८ मेपर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, १० मे रोजी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडून एक कोटी ८२ लाख ५२ हजार ४५० मात्रा उपलब्ध झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे सात लाख १८ हजार ५६१ मात्रा राज्याच्या हाती असून, एक लाख १३ हजार ३३० मात्रा अजून महाराष्ट्राला लवकरच मिळणार आहेत. शिवाय सुमारे दीड लाख मात्रांचा पुरवठा केंद्र सातत्याने राज्याला पुरवठा करत आहे. असे असतानाही राज्यातील ठरावीक केंद्रे पूर्ण क्षमतेने लसीकरण करत आहेत, तर काही केंद्रांवर लसीचा खडखडाट आहे. राज्य सरकारने वाटपाच्या नियोजनातील गोंधळ थांबवून लसीचे न्याय्य वाटप करावे, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.