राज्य सरकारने भुजबळांवर केलेल्या अटकेच्या विरोधात समर्थकांचा न्यायालयीन लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 04:09 PM2018-01-24T16:09:29+5:302018-01-24T16:14:28+5:30

भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

The state government's judicial fight against the arrest of Bhujbal | राज्य सरकारने भुजबळांवर केलेल्या अटकेच्या विरोधात समर्थकांचा न्यायालयीन लढा

राज्य सरकारने भुजबळांवर केलेल्या अटकेच्या विरोधात समर्थकांचा न्यायालयीन लढा

Next
ठळक मुद्देअन्याय पे चर्चा : सूडबुद्धीने कारवाई होत असल्याने विरोध भुजबळ समर्थक पुन्हा एकदा लढ्यासाठी सज्ज

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बुधवारी नाशिकचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत न्यायालयीन लढाईसोबतच लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचा समर्थकांच्या चर्चेत सुरू निघाला.
सर्वाेच्च न्यायालयाने अडचणीचे कलम थेट रद्द ठरविल्यानंतरही राज्य सरकार ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळू देत नसून त्यामुळे भुजबळ समर्थक पुन्हा एकदा लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे भुजबळ यांचे एकेकाळचे विरोधक म्हणवले जाणारे राष्टवादी आणि अन्य पक्षातील नेत्यांनीदेखील भुजबळ यांना समर्थन दिले आहे. त्यातच आता अन्याय पे चर्चा उपक्रमाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी खासदार पिंगळे यांच्या निवासस्थानी झालेल्या या अन्याय पे चर्चा उपक्रमात माजी उपमहापौर गुरु मितसिंग बग्गा, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, गोकुळ पिंगळे, अ‍ॅड. संदीप गुळवे, हिरामण खोसकर, डॉ. सयाजीराव गायकवाड, मधुकरराव जेजुरकर, वसंतराव मुळाणे, योगेश कमोद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गुरुमितसिंग बग्गा यांनी, आजवर देशाच्या इतिहासात विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही. त्यातही महाराष्ट्रात असा प्रकार घडला नव्हता; मात्र आता छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणेला भुजबळांविरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांना सरकारकडून तुरुगात डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा भावना यावेळी बग्गांसह उपस्थितांनी व्यक्त केल्या.


तसेच सध्या देशातील व्यवस्थेच्या विरोधात जो नेता आवाज उठवेल त्याला कुठल्यातरी मार्गाने अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब आहे. तरीदेखील या सर्व प्रकरणातून छगन भुजबळ तावून सुलाखून निर्दोष बाहेर येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

Web Title: The state government's judicial fight against the arrest of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.