शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:07 PM2020-01-10T16:07:39+5:302020-01-10T16:08:11+5:30
सटाणा: येथे अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुनिल निकुंभ होते. संमेलनाचे उद्घाटन पी.टी.शिंपी यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्त सटाणा शहरातून श्री नामदेव महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सुनिल निकुंभ, पी.टी.शिंपी, मुकूंद मांडगे, संजय खैरणार, हेमंत सोनवणी, हर्षदा बोरसे, वंदना जगताप आदींची भाषणे झाली.
संमेलनात अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्षपदी वंदना जगताप, युवा अध्यक्षपदी प्रमोद शिंपी यांची निवड करण्यात आली. नविनर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वागताध्यक्ष रोहित तरटे यांनी केला. यावेळी नामविश्व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलनास सुनिल जगताप, नितीन बिरारी, शशीकांत सोनवणे, मोहन कापडणीस, खंडेराव जाधव, कामिनी निकुंभ, निता चव्हाण,स्मिता बिरारी, मिना बागुल, भारती निकुंभ, शैला भामरे, राजश्री पगारे, मिना सोनवणे, लता पगारे, शैला मांडगे, सुलोचना कापूरे, आशा निकुंभ, संगीता खैरणार, मिनाक्षी खैरणार आदीसह समाज बांधव उपस्थित होते.