नाशिकमध्ये उद्या नगरसेवकांना राज्यस्तरीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:32+5:302021-01-16T04:18:32+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांसाठी नगरसेवक परिषदेच्यावतीने रविवारी (दि.१७ ) राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक परिषदेचे उपाध्यक्ष तथा आयोजक ...
महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांसाठी नगरसेवक परिषदेच्यावतीने रविवारी (दि.१७ ) राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक परिषदेचे उपाध्यक्ष तथा आयोजक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील नगरपंचायत नगरपालिका व
महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांच्या न्याय
हक्कासाठी काम करण्या करिता व शासन दरबारी योग्य ती दखल घेण्यास सुचविण्याकरिता नगरसेवक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.नाशिक विभागातील सर्व नगरसेवकांचा रविवारी सातपूर येथील हॉटेल मसाला झोन येथे दुपारी एक वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर महापालिका सभागृहनेते विजय झलके,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संभाजी मोरे,पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गुजर तसेच संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे,प्रदेश सचिव डॉ.कैलास गोरे पाटील,कार्याध्यक्ष संजीव वाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
या मेळाव्यास नगरसेवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा आयोजक दिनकर पाटील जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड,सलीम शेख,पुरुषोत्तम लोहगावकर,पुष्पा आव्हाड,अर्चना धात्रक आदींनी केले आहे.