राज्यस्तरीय संमेलन: निसर्गोपचारपध्दतीबाबत अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:12 PM2018-09-30T18:12:16+5:302018-09-30T18:14:31+5:30

 State-level meeting: The need to start curriculum for natural therapy | राज्यस्तरीय संमेलन: निसर्गोपचारपध्दतीबाबत अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज

राज्यस्तरीय संमेलन: निसर्गोपचारपध्दतीबाबत अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज

Next
ठळक मुद्दे राज्यस्तरीय नैसर्गिक चिकित्सा-योग संमेलन नाशिकमध्ये पार पडले. १८ नोव्हेंबर ‘निसर्गोपचार दिवस’

नाशिक : केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली असून राज्य सरकारने निसर्गोपचारपध्दतीबाबत स्वतंत्र कायदा दोन वर्षांपुर्वी केला आहे; मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. निसर्गोपचार पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम राज्यस्तरावर सुरू करण्याची गरज असल्याचा सूर निसर्गोपचारकांच्या राज्यस्तरीय संमेलनातून उमटला.
इंटरनॅशनल नॅच्युरोपॅथी आॅर्गनायझेशन व शिव गोरक्ष योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय नैसर्गिक चिकित्सा-योग संमेलन नाशिकमध्ये रविवारी (दि.३०) पार पडले. आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या सभागृहात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिव गोरक्ष योगपीठाचे भगवानदास महाराज होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, कमलाताई चव्हाण, नॅच्युरोपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनंत बिरादर, महामंडलेश्वर शिवानंद महाराज, श्यामसुंदर तीवारी, नॅच्युरोपॅथी इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. सत्त्यलक्ष्मी, योगशिक्षक प्रज्ञा पाटील डॉ. सुशांत पिसे, डॉ. नितीन शिंपी, डॉ. रमाकांत जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
निसर्गोपचारपध्दती ही पुरातन आरोग्यउपचारपध्दती असून निरामय शारिरिक-मानसिक आरोग्यासाठी या उपचारपध्दतीचा विकास अत्यावश्यक आहे. आरोग्य विद्यापीठामधून निसर्गोपचाराबाबतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारकडून १८ नोव्हेंबर हा निसर्गोपचार दिवस म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती यावेळी सत्यलक्ष्मी यांनी दिली. सरकारने निसर्गोपचार महाविद्यालयाच्या उभारणीसाठी पुण्यात २५ एकर जागा व व २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्यामुळे लवकरच पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्र म सुरू होतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. संमेलनाला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून निसर्गोपचारक उपस्थित होते. सुत्रसंचालन महेश उपासनी यांनी केले.

१८ नोव्हेंबर ‘निसर्गोपचार दिवस’
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने १८ नोव्हेंबर निसर्गोपचार दिवस म्हणून घोषित करण्यात आलाु आहे. या दिवसाच्या औचित्यावर आॅर्गनायझेशनच्या वतीने जनजागृतीपर अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माहितीफलकाचे अनावरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
--

Web Title:  State-level meeting: The need to start curriculum for natural therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.