राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
By admin | Published: December 20, 2015 10:43 PM2015-12-20T22:43:46+5:302015-12-20T22:46:30+5:30
नाईक महाविद्यालय : वीस संघांचा सहभाग
नाशिक : येथील नाईक महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब गामणे, दामोदर मानकर, संचालक शरद बोडके, आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक काकड, प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर, उपप्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी व विद्यापीठ प्रतिनिधी पंकज नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन पंकजा अहिरे यांनी केले. प्रा. नंदा बोरसे यांनी आभार मानले.
या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून पिंपळगाव महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानोबा ढगे, पी. व्ही. जी. महाविद्यालयाचे प्रा. अमर ठोमरे व जयश्री पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण २0 महाविद्यालये सहभागी झाले होते. या सहभागी स्पर्धकांनी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे योगदान, भारतीय लोकशाहीचे बदलते स्वरूप व आजची स्त्री या विषयावर आपले मत मांडले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर, प्रा. तुकाराम भवर, प्रा. नंदा बोरसे, प्रा. वंदना बनकर, प्रा. राखी दाभाडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)