राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:36 IST2019-03-31T00:35:48+5:302019-03-31T00:36:06+5:30

येथून जवळच असलेल्या जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

 State level oratory competitions enthusiasm | राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

एकलहरे : येथून जवळच असलेल्या जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विविध विषयांवर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण वक्तृ त्व सादर केले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता कळमकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक किरण सोनार, योगेश खरे, प्रवीण शिंदे, संतोष फड उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंकज दशपुते, हर्षाली घुले व मुत्सजीप खान यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन स्वाती माळी यांनी केले तर आभार देवीदास राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपाली पळसे हिला मिळाले. द्वितीय पारितोषिक श्वेता भामरे, तृतीय व चतुर्थ प्रतीक्षा नार्वेकर व सतीश कांबळे यांना मिळाले. कचरू कळमकर, संजय खाडे, प्रकाश पगारे, अरु ण धात्रक यांंच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

Web Title:  State level oratory competitions enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक