राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:14 PM2020-01-21T17:14:48+5:302020-01-21T17:19:37+5:30
संदीप पॉलिटेक्नीक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
नाशिक: संदीप पॉलिटेक्नीक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा मंगळवारी (दि.२१) उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन तंत्रशिक्षण संचलनालयाचे सहसंचालक डी. पी. नाठे, सहाय्यक सचिव डी. आर. दंडगव्हाळ, प्राचार्य प्रशांत पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
नाठे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक द्दष्टीकोनातून व्यक्तीमत्व विकास साधण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणासोबतच अधिकाअधिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. औरंगाबाद आणि नागपूर विभागासाठी संदीप पॉलिटेक्नीक येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ३९ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये एनआयटी पॉलिटेक्निक नागपूर येथील रजत सोनी आणि डेव्हिड सावरकर यांनी प्रथम क्र मांक मिळविला. तर गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नंदुरबार येथील शिवम तांबटकर आणि सागर सोनवणे यांनी द्वितीय क्र मांक मिळविला व पद्मश्री वि. वि. पाटील पॉलिटेक्निक लोणी येथील महेश वनी महेश आणि निलेश खड्डे यांनी तृतीय क्र मांक मिळविला. यासाठी त्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी डी. व्ही. लोहार, ए. डी. मोरे, एम. के. थोरात, मिलींद बोबडे, एम. आर. जाधव, एस. के. आहेर यांनी निरिक्षक म्हणून काम बघितले.