मेशी जनता विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 05:22 PM2020-01-20T17:22:49+5:302020-01-20T17:23:20+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च विद्यालयातील नववीचा विद्यार्थी गौरव आहिरे याने विज्ञान शिक्षक आर. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक हिरवा राज्य महामार्ग हे उपकरण तयार करून जिल्हास्तरीय इन्स्पायरड अवार्ड योजने अंतर्गत या उपकरणाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सध्या प्रदुषण विळखा सर्वत्र पसरला आहे. याचे भयानक परिणाम सगळ्यांना भोगावे लागत आहेत. महामार्गवर खूप मोठ्या प्रमाणावर वाहाने चालतात त्यामुळे मानवी आरोग्य बिघडत चालले आहे.
या पाशर््वभूमीवर महामार्गावर प्रदुषणविरहीत वातावरण निर्माण कसे करता येईल याचे अतिशय उत्तम सादरीकरण या उपकरणाद्वारे दाखिवण्यात आले होते. यासाठी अतिशय साधे साहित्य वापरण्यात आला आहे. उपकरणाने प्रभावीत करून त्याची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
एकुण ५५९ उपकरणात १० टक्के उपकरणाची म्हणजे ५६ उपकरणांची राज्यस्तरीय निवड आयोजकांनी केली आहे. विद्यार्थी आहिरे आणि त्यास मार्गदर्शन शिक्षक करणारे आर. बी. निकम यांनी मेहनतीने बनवलेल्या राज्यावर निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ह्या यशाबद्दल प्राचार्य डी. जे. रणधिर, उपमुख्याध्यापक आर. ई. ओतारी, पर्यवेक्षक व्ही. टी. कापडणीस यांनी सत्कार केला.
(फोटो २० मेशी)
मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी व शिक्षक आर. बी. निकम यांनी तयार केलेल्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाल्याने संदीप फाऊंडेशनचे अधिकारी.