सटाणा महाविद्यालयात यशस्वी पदार्थ विज्ञान राज्यस्तर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:50 PM2020-02-03T17:50:48+5:302020-02-03T17:51:42+5:30

सटाणा : येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील नवसंशोधन संधी बाबत दोन दिवसांचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे होते.

State Level Seminar on Successful Materials Science at Satana College | सटाणा महाविद्यालयात यशस्वी पदार्थ विज्ञान राज्यस्तर चर्चासत्र

सटाणा महाविद्यालयात यशस्वी पदार्थ विज्ञान राज्यस्तर चर्चासत्र

Next
ठळक मुद्दे संशोधनाचे महत्व व संशोधन क्षेत्रात असलेल्या नवनवीन संधींबाबत मार्गदर्शन

सटाणा : येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील नवसंशोधन संधी बाबत दोन दिवसांचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी प्रास्ताविक भाषणात संशोधनाचे महत्व व संशोधन क्षेत्रात असलेल्या नवनवीन संधींबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रात डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी संशोधन क्षेत्रात पेटंटचे महत्व व ते नोंदविण्यासाठी प्रक्रि या यावर मार्गदर्शन केले.
पदार्थ विज्ञान क्षेत्रात होत असलेल्या मूलभूत संशोधनावर डॉ. मृणालिनी देशपांडे, डॉ. डी. एस. पाटील, डॉ. आर. बी. टोचे, डॉ. एस. जे. नान्द्रे यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. बी. एन. डोळे, डॉ. सी. एम. काळे यांनी नॅनो टेक्नॉलॉजी डॉ. एस. डी. चव्हाण यांनी सोलर पॅनल टेक्नोलॉजी तर डॉ. आर. एस. तिवारी यांनी इंटरनेट आॅफ थिंग्ज (आय.ओ.टी.) या क्षेत्रातील संशोधन व रोजगार संधींविषयी मार्गदर्शन केले.
औद्योगिक भेटीसाठी सटाणास्थीत आर्मस्ट्रोग कंपनीला भेट देऊन कंपनीची कार्य पद्धती समजून घेतली. संशोधनाला सामाजिक जीवनात उतरवण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मेहनत घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. धोंडगे यांनी समारोपाच्या भाषणात केले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. सी. एल. सासले यांनी तर आभार डॉ. पी. ई. पाटील यांनी मानले. दोन दिवसीय चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: State Level Seminar on Successful Materials Science at Satana College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.