चांदवड तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय टेक्नीकल क्विझ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 07:01 PM2019-02-15T19:01:49+5:302019-02-15T19:02:37+5:30

चांदवड - महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई व एस.एन.जे.बी. संचलित एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतन चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ स्पर्धा संपन्न झाली.

State-level Technical Quiz Competition in Chandwad Polytechnic | चांदवड तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय टेक्नीकल क्विझ स्पर्धा

चांदवड तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय टेक्नीकल क्विझ स्पर्धा

Next

या स्पर्धेत राज्यातील २१ संघांनी सहभाग घेतला. प्रथम पारितोषिक श्री एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन चांदवडच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी संकेत कंकरेज व प्राजक्ता बागुल यांनी पटकावला. द्वितीय क्र मांक के.के.वाघ तंत्रनिकेतन नाशिकच्या सुमित कासार व योगेश लिलाके तसेच तृतीय क्रमांक शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबादच्या शंतनु भारडे व आनंद राजपूत यांनी पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना आर.बी.टी.ई. औरंगाबादचे उपसचिव डॉ. आनंद एन पवार, यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम चांदवडचे मानद सचिव जवाहरलाल आबड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी औरंगाबाद येथील आर. बी. टी. ई.चे उपसचिव डॉ.आनंद एन पवार, परिक्षक प्रा. एन. जी. वायकोळे, प्रा. एस. पी. दीक्षित, प्रा. पी. एम. आहेर व डी. एस. कशाळकर, प्राचार्य एच. एस. गौडा, प्रा. आर. सी. तिवारी, प्रा. डी. व्ही.लोहार, प्रा.पी.एम.बाफणा उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.एम.जी.जैन व आभार प्रदर्शन प्रा.डी. बी.पवार यांनी केले.

Web Title: State-level Technical Quiz Competition in Chandwad Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.