राज्यमंत्रिपदाचा दर्जा महापौरांनाही द्यावा !
By admin | Published: April 25, 2017 02:25 AM2017-04-25T02:25:41+5:302017-04-25T02:25:50+5:30
नाशिक : महापौरांना प्रशासकीय अधिकार मिळण्याबरोबरच राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची मागणी महापौर रंजना भानसी यांनी ग्वाल्हेर येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेत बोलताना केली
नाशिक : महापौरांना प्रशासकीय अधिकार मिळण्याबरोबरच राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची मागणी महापौर रंजना भानसी यांनी ग्वाल्हेर येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेत बोलताना केली. याचवेळी महापौरांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची मांडणी करतानाच सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परिषदेने शासनस्तरावर प्रयत्न करण्याचीही मागणी करण्यात आली.
आॅल इंडिया कौन्सिल आॅफ मेअर्सच्या वतीने ग्वाल्हेर येथे ४८ व्या अखिल भारतीय महापौर परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेसाठी महापौर रंजना भानसी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेत बोलताना महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, महापौरांना देश-विदेशांत अनेक संस्थांमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी निमंत्रित केले जात असते. या अभ्यासदौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी महापालिका प्रशासकीय स्तरावर विशेष निधीची
तरतूद केली पाहिजे. याशिवाय, महापौरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याबरोबरच त्यांना प्रशासकीय अधिकारही देण्याची मागणी भानसी यांनी केली.
यावेळी मध्य प्रदेशच्या नगरविकास मंत्री श्रीमती माया सिंह, ग्वाल्हेरचे महापौर विवेक शेलवलकर, महाराष्ट्रातील आमदार अनिल सोले, अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष विनोद चमौली, महामंत्री उमाशंकर गुप्ता, जनरल सेक्रेटरी अरोरा यांच्यासह भारतातील प्रमुक शहरांतील ५९ महापौर उपस्थित होते. (प्रतिनिधी)