रेस्टॉरंट, मंदिरांबाबतचा निर्णय राज्य टास्क फोर्स घेईल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 06:54 PM2021-08-07T18:54:36+5:302021-08-07T19:00:19+5:30

जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा.

The state task force will decide on restaurants and temples | रेस्टॉरंट, मंदिरांबाबतचा निर्णय राज्य टास्क फोर्स घेईल : छगन भुजबळ

रेस्टॉरंट, मंदिरांबाबतचा निर्णय राज्य टास्क फोर्स घेईल : छगन भुजबळ

Next
ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. ग्रामीण भागात २४ व शहरी भागातील १३ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती

नाशिक : रेस्टॉरंट, परमिट रूम बिअरबार पूर्ववत सुरू करण्याची तसेच श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता मंदिरे उघडे करण्याबाबत मागणी होत असली तरी, याबाबतचा निर्णय राज्याचा टास्कफोर्स घेईल, स्थानिक पातळीवर याबाबतचे अधिकार नाहीत असा निर्वाळा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देतानाच कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय असल्याचे सांगितले.

शनिवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचीदेखील डेल्टा तपासणी करण्यात येऊन संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत.
विषाणू कोणताही असो त्यापासून स्वत: सोबत आपल्या कुटुंबाचा व निकटवर्तीयांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणेदेखील गरजेचे आहे. याअनुषंगाने कोरोनाची भीती पूर्णत:संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात २४ व शहरी भागातील १३ ठिकाणी अशा एकूण ३७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम ३१ ऑगस्ट अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ.संजय गांगुर्डे, डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.

Web Title: The state task force will decide on restaurants and temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.