राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:26 PM2019-11-04T20:26:01+5:302019-11-04T20:30:41+5:30

वणी : येथील के. आर. टी. हायस्कूल येथील शिक्षक प्रविण पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्र मासाठी टीचर इंनोवेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

State Teacher Innovation Award conferred on Praveen Panpatil | राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान

राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान

googlenewsNext
ठळक मुद्दे नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्र मशील शिक्षकांमधून ही निवड

वणी : येथील के. आर. टी. हायस्कूल येथील शिक्षक प्रविण पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्र मासाठी टीचर इंनोवेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासन, रवी जय मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आय आय एम) अहमदाबाद, हनी बी व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्र मशील शिक्षकांमधून ही निवड केली जाते. सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये हे पारितोषिक वितरण संपन्न झाले.
यावेळी पुणे येथील बालभारतीचे अधिकारी डॉ. अजय कुमार लोळगे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालिका शोभा खंदारे, अभय दिवाण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, एम. के. सी. एल. के. चे कार्यकारी संचालक विवेक सावंत, टी.सी.एम.चे मुख्य शास्त्रज्ञ विपुल शहा, उदय पाचपुते, अरु ण देशपांडे, गुजरात येथील शिक्षण तज्ञ डॉ. भावेश पंड्या, एम.सी.ई. आर.टी. च्या गीतांजली बोरु डे, सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रविण पानपाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, दत्तात्रय पाटील, मविप्र शिक्षण अधिकारी एस. के. शिंदे, शालेय समिती अध्यक्ष विलास कड सर्व शालेय स्ािमती सदस्य, मुख्याध्यापक डी.बी. चंदन, उपमुख्याध्यापक ए. बी.ढोकरे, पर्यवेक्षक एस व्ही. खुर्दळ, ए. बी.ठुब आदींनी कौतुक केले.
 

Web Title: State Teacher Innovation Award conferred on Praveen Panpatil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.