धुळ्यात राज्य महिला परीषद यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:40 AM2021-03-09T00:40:40+5:302021-03-09T00:41:03+5:30
दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
दिंडोरी : जागतिक महिला दिनानिमिताने रविवारी (दि.७) दुपारी ४ वाजता धुळे येथे महिला परिषद संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना प्रेरणा म्हणून राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौजन्या पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, चोपड्याच्या नगराध्यक्ष मनिषा चौधरी, धुळ्याच्या नगरसेवक वंदना भामरे, उद्योजिका मनिषा डियालाणी आदी मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भामरे, दिपक काशिनाध पाटील, योगीराज मराठे, परशुराम देवरे यांचे योगदान लाभले. यावेळी चोपड्याचे माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी, किशोर डियालाणी, विलास माळी, विश्वास पगार, डॉ. प्रविणसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, प्रा.समाधान चौधरी, गोकुळ पाटील, सुधीर सनेर, सुकलाल बोरसे, प्रा.भामरे तसेच आमंत्रित महिला उपस्थित होत्या.
सदर महिला परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रेमकुमार अहिरे, डी. बी. पाटील व संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एच. ए. पाटील, आर. आर. सोनवणे, मनोज पाटील, राकेश जाधव, हिर विजय वाघ, कांतिलाल देवरे, वैभव पाटील, हर्षल महाजन, निसर्ग अहिरे आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक अर्चना सोनवणे, सुत्रसंंचालन उषा पाटील, तर आभार प्रदर्शन डॉ. मेघा पाटील यांनी केले.
राजमाता जिजाऊ पुरस्कारार्थी
मनिषा जीवन चौधरी, चोपडा, जळगाव, डॉ. निशा सुशील महाजन, धुळे, मिना परशुराम देवरे, बोरीस, वंदना दिलीप पाटील पुणे, विजया तानाजी पाटील, नाशिक, सिमा आत्माराम देसले, साक्री, धुळे, साधना सुधीर पाटील, मनमाड, नाशिक, पुष्पा शंकर मतकर, मनमाड, नाशिक, सुनिता विलास माळी, गोंदूर, धुळे, दिव्या यशवंत पाटील, भडगाव, जळगाव, मनिषा किशोर डियालाणी, धुळे, वैशाली रोहीदास झाल्टे, जळगाव, सपना रामकृपाल श्रीवास्तव, जळगाव, वैशाली शिवाजी अहिरे, वायगाव.