राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शरद धात्रक अंतिम विजेता

By admin | Published: February 2, 2015 12:30 AM2015-02-02T00:30:48+5:302015-02-02T00:31:37+5:30

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शरद धात्रक अंतिम विजेता

State wrestling champion Sharad Dhootar final winner | राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शरद धात्रक अंतिम विजेता

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शरद धात्रक अंतिम विजेता

Next

  लासलगाव : माजी आमदार कै. दत्ताजी पाटील स्मृती सोहळा लासलगाव : येथील माजी आमदार कै. दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यात गुरुवार, दि. २९ रोजी कुस्त्यांची विराट दंगल संपन्न झाली. देशी खेळ विस्मृतीमध्ये जात असल्याने देशी खेळांना उत्तेजन मिळावे म्हणून कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रक संजय पाटील यांनी सांगितले. औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, येवला, मनमाड व ग्रामीण भागातील कुस्तीपटू, मल्ल यावेळी मोठ्या संख्येने हजर होते. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी हनुमान व्यायाम मंडळाचे मार्गदर्शक दादासाहेब कदम हे होते. शहरातील अबालवृद्ध व कुस्तीप्रेमी, नागरिकांनी कुस्त्या पाहण्यास मोठी गर्दी केली होती . लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांसाठी लाल मातीचा फड बणवण्यात आला होता. प्रारंभी शाळेतील लहान कुस्तीपटूंच्या कुस्त्या झाल्या

Web Title: State wrestling champion Sharad Dhootar final winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.