शिक्षकांबाबत प्रहारचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:15 AM2021-08-01T04:15:11+5:302021-08-01T04:15:11+5:30
------------ खुल्या रंगमंचावर चारचौघीचे अभिवाचन नाशिक : इप्टा नाशिक या संस्थेच्या वतीने तीन दशके रंगभूमी गाजवलेल्या चारचौघी या प्रशांत ...
------------
खुल्या रंगमंचावर चारचौघीचे अभिवाचन
नाशिक : इप्टा नाशिक या संस्थेच्या वतीने तीन दशके रंगभूमी गाजवलेल्या चारचौघी या प्रशांत दळवी लिखित नाटकाचे अभिवाचन खुल्या रंगमंचावर करण्यात आले. या नाट्य अभिवाचनाचे दिग्दर्शन तुषार कुलकर्णी यांनी केले, तर शिल्पा देशमुख, पूजा पूरकर, अर्पिता संयोगिता, निकिता बंदावणे, ओम शेवाळे, तुषार कुलकर्णी, विक्रांत धिवरे यांनी अभिवाचन केले.
--------------
कामटवाडे गावात धूरफवारणी
नाशिक : कामटवाडे परिसरात डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी या भागात नई उमंग फाउंडेशनच्या वतीने धूरफवारणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या विश्रांतीनंतर करण्यात आलेल्या या धूरफवारणीने परिसरातील नागरिकांना डासांपासून बचावासाठी प्रयत्न करण्यात आले असून, नागरिकांनीदेखील घराजवळ पाणी साचून राहू नये, यासाठी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
रामकुंड परिसरात स्वच्छता
नाशिक : गोदावरीच्या पुरात वाहून आलेल्या पाणवेली, कचरा, तसेच अन्य कचरा मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून हटविण्यात आला, तसेच रामकुंडाबाहेरील भागातही स्वच्छता करण्यात आली, तसेच निर्माल्य टाकण्यासाठी गोदावरीच्या दोन्ही काठांवर विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचा उपयोग करण्याचे आवाहनदेखील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
------------
फ्रेंडशिप डे सुनासुना
नाशिक : गतवर्षीप्रमाणेच यंदादेखील फ्रेंडशिप डे सुनासुना जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या फ्रेंडशिप डेसाठी फ्रेंडशिप डे बॅण्ड, तसेच अन्य भेटवस्तूंच्या दालनांनी गिफ्ट आर्टिकल्स फुलून जात होती. मात्र, यंदा तसे कोणतेही चित्र नाही. गत वर्षाप्रमाणेच यंदादेखील महाविद्यालये बंद असल्याने फ्रेंडशिप डे सुनासुनाच जाण्याची चिन्हे आहेत.