महिलांवरील अत्याचार प्रकरणी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:36+5:302021-01-03T04:15:36+5:30

काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील बलात्काराची घटना घडली.यामध्ये राजकीय नेत्याचे नाव समोर आले आहे.याप्रकरणी अद्यापही संबंधितांची चौकशी झालेली नसल्याचे निवेदनात ...

Statement on atrocities against women | महिलांवरील अत्याचार प्रकरणी निवेदन

महिलांवरील अत्याचार प्रकरणी निवेदन

Next

काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील बलात्काराची घटना घडली.यामध्ये राजकीय नेत्याचे नाव समोर आले आहे.याप्रकरणी अद्यापही संबंधितांची चौकशी झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे तीन वर्षीय बालिकेवर एका जामीनावर सुटलेल्या नराधमाने अत्याचार करून हत्या केली. या प्रकरणातही अद्याप तपासाला गती आलेली नाही. पोलीस प्रशासनाने औरंगाबाद व पेण येथील घटनांबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे या घटनेची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन प्रसंगी भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा सहसंयोजक ऐश्‍वर्या पाटील, नाशिक महानगर मंत्री सिद्धेश खैरनार, महानगर सहमंत्री दिव्या सिंग, पंचवटी नगर मंत्री प्रियंका पाटील, हर्षदा कदम, संस्कृती शेळके, अथर्व कुळकर्णी, राकेश साळुंखे, ओम माळुंजकर , विराज भामरे आदी उपस्थित होते.

(आर:०१कलेक्टर नावाने)

Web Title: Statement on atrocities against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.