शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने बॅँकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:48 PM2020-02-12T17:48:17+5:302020-02-12T17:49:15+5:30
नांदगांव : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे याबाबत बुधवारी (दि.१२) आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदगांव तालुक्याच्या वतीनेशहरातील बँकांना निवेदन देण्यात आले.
नांदगांव : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे याबाबत बुधवारी (दि.१२) आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदगांव तालुक्याच्या वतीनेशहरातील बँकांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शेती पिकांच्या नुकसानीमुळे पिकांवर झालेला खर्च देखील मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालीआहे.
त्यामुळे शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनामार्फत शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. परंतु ज्या शेतकºयांकडे बँकांचे कर्ज थकबाकी आहे. अशा शेतकºयांच्या अनुदानाची रक्कम शेतकºयांना रोख स्वरूपात न देता बँकांमार्फत परस्पर कर्ज खात्यात जमा करण्यात येत आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर आदी कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मिळणारे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे असे शासनाचे आदेश आहेत.
तसेच त्याबाबत शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे. तरीही बँका शतकºयांचे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा करत आहे. त्यामुळे नांदगांव शहरातील भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, कॉर्पोरेशन बँक आदी बँकांना आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यापुढे नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा केल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
यावेळी तालुका प्रमुख किरण देवरे, माजी तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप, शहर प्रमुख सुनील जाधव, प्रमोद भाबड, सागर हिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.