शिवसेनेच्या वतीने निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:41 PM2020-06-29T23:41:16+5:302020-06-29T23:43:22+5:30
पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सदोष वीज देयके अदा केल्याने पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मधील शेकडो ग्राहकांना वीज देयके रक्कम जमा करण्यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना सदोष वीज देयके अदा केल्याने पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मधील शेकडो ग्राहकांना वीज देयके रक्कम जमा करण्यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडलेले असताना वीज वितरण कंपनीने अंदाजे वाढीव रक्कमेचे देयके वाटप करत ग्राहकांना आर्थिक शॉक दिल्याने ग्राहकांना सदोष वीज देयके देत दुरु स्ती करावी, अशी मागणी पंचवटी शिवसेनेच्या वतीने करण्यात येऊन पंचवटी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेनेचे महानगर संघटक दिगंबर मोगरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी पंचवटी वीज वितरण कंपनी कार्यालयात धाव घेत वीज ग्राहकांना देण्यात आलेली सदोष वीज देयके तत्काळ दुरु स्ती करून देण्याबाबत उपकार्यकारी अधिकाºयांशी चर्चा केली.
जोपर्यंत दुरुस्ती केलेली वीज देयके देत नाही तोपर्यंत वीज ग्राहकांना वीज देयके भरणा करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अमोल सूर्यवंशी, विभागप्रमुख विश्वास, राहुल देशमुख, बापू सोनवणे, जगन गोरे, अशोक जाधव, तौसिफ शेख उपस्थित होते. बिलासाठी सवलत द्यावी
गेल्या तीन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीमार्फत ग्राहकांना वीजदेयके वाटप करण्यात आलेले नव्हते, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अंदाजे पाठविले मात्र सदरची देयके सदोष असल्याने त्यातच ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली. वीज वितरण कंपनीने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता गेल्या तीन महिन्यांचे वीज बिल भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुदत द्यावी, अशी मागणी आमदार राहुल ढिकले यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक छोटे-मोठे उद्योग बंद असल्याने फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.