शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:58 PM2020-07-27T21:58:34+5:302020-07-28T00:31:54+5:30
कवडदरा : कोरोना काळात ग्रामीण व शहरी भागात शिक्षकांनी गेली दोन महिने कोविडयोद्धा म्हणून कर्तव्य बजावले आहे. यात काही शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली, तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

कोविड ड्यूटीवर असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी. त्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे. उपासमारीमुळे ज्या विनाअनुदानित शिक्षकांनी जीवन संपवले आहे त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच त्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे. तसेच घोषित, अघोषित सर्वच विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान वितरित करावे आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख असल्याचे शिक्षक नेते संतोष रोंगटे यांनी सांगितले.