मुखेड फाट्यावर गतिरोधकाच्या मागणीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:11 PM2020-08-17T15:11:46+5:302020-08-17T15:12:53+5:30

पिळगाव बसवंत : परिसरातील आदिवासी वस्ती असलेल्या अंबिका नगरच्या मुखेड त्रिफुलीवर प्राथमिक शाळा व मंदिर असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे त्याठिकाणी सर्कल व गतिरोधक टाकावे अशी मागणी आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Statement for demand for speed bumps at Mukhed fork | मुखेड फाट्यावर गतिरोधकाच्या मागणीसाठी निवेदन

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना निवेदन देताना दत्तु झनकर, विजय भडांगे, तानाजी पवार,दत्तु मोरे आदी.

Next
ठळक मुद्देछोटे मोठे अपघात सातत्याने घडले आहे.

पिळगाव बसवंत : परिसरातील आदिवासी वस्ती असलेल्या अंबिका नगरच्या मुखेड त्रिफुलीवर प्राथमिक शाळा व मंदिर असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे त्याठिकाणी सर्कल व गतिरोधक टाकावे अशी मागणी आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सुरत शिर्डी महामार्गाचे काम सुरू असून त्या महामार्गालगत पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिका नगर ही महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली दाट लोकसंख्येची वस्ती आहे, तसेच त्याच ठिकाणी मंदिर आणि प्राथमिक शाळा देखील आहे. या आगोदर त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात सातत्याने घडले आहे, पण भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात घुडू नये यासाठी त्याठिकाणी गतिरोधक व एक छोटेसे सर्कल उभारावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप गांगुर्डे,तालुका अध्यक्ष दत्तु झनकर, महिला अध्यक्ष संगीता कराटे, विठाबाई पवार, दत्तु मोरे, विजय भंडागे,तानाजी पवार, हरी रोकडे, दीपक वाघ,अंकुश शेखरे, युवराज चोथवे आदी उपस्थित होते.

Web Title: Statement for demand for speed bumps at Mukhed fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.