चिकुन गुन्या साथरोगाबाबत वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:09+5:302021-07-12T04:10:09+5:30
चिकुन गुन्यासारख्या साथरोगावर उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठी किंमत मोजावी लागत असल्याने अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना ते ...
चिकुन गुन्यासारख्या साथरोगावर उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठी किंमत मोजावी लागत असल्याने अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना ते परवडणारे नाही. यासाठी ग्रामीण रुग्णालयातच आवश्यक तो औषधसाठा, वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आदी बाबी सुव्यवस्थित आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भूमिका जाहीर करण्यात आली.
कोरोना, लॉकडाऊनदरम्यान सामान्य लोकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच चिकुन गुन्यासारख्या साथरोगांनी आपले डोके वर काढायला सुरुवात केल्याने सामान्य नागरिकांना खासगी, महागडे उपचार घेणे शक्य नाही. या आरोग्य आणीबाणीत जिल्हा आरोग्य यंत्रणेने रुग्णांना औषधोपचार करून आरोग्यविषयक दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादासाहेब खरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो- ०९ सटाणा चिकुन गुन्या
090721\4418001809nsk_24_09072021_13.jpg
फोटो- ०९ सटाणा चिकनगुनिया