प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:48 PM2020-09-07T17:48:19+5:302020-09-07T17:50:14+5:30
जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले.
जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात एकावेळी तालुकास्तरावर सोमवारी (दि.७) संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले ते नायब तहसीलदार दर्शना सुर्यवंशी यांनी स्विकारले.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी, २९ सप्टेंबर २०१८ ची अधिसूचना रद्द करावी, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्यावी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख पदे अभवितपणे शिक्षकांमधून भरण्यात यावी. कॅशलेस विमा योजना लागू करावी. जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावी. कोव्हीड १९ चे कर्तव्य बजावताना ज्या शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख विमासंरक्षण अनुदान द्यावे. आदी प्रश्नांवर निवेदन देण्यात आला. निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी यांना देण्यात आली.
यावेळी निवेदन देताना तालुका कार्यवाह रवींद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कोषाध्यक्ष संदिप झोटिंग, सहकार्यवाह नितीन शिंदे, शाहुल वानखेडे, सुधाकर नाठे, रवींद्र काकुळते आदी उपस्थित होते.