लाखलगाव ग्रामपंचायतीबाबत पालमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:36+5:302021-03-22T04:13:36+5:30
यावेळी लाखलगाव-गंगापाडळी ग्रामपंचायत अखत्यारीतील अंतर्गत रस्त्यांचे प्रस्तावही सादर करण्यात आले. लाखलगावातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, नवीन रस्ते बनविणे आदी मागण्या ...
यावेळी लाखलगाव-गंगापाडळी ग्रामपंचायत अखत्यारीतील अंतर्गत रस्त्यांचे प्रस्तावही सादर करण्यात आले.
लाखलगावातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, नवीन रस्ते बनविणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. बँकेच्या कर्जाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केलेले शिलापूर येथील शेतकरी कै.वाळू महाले या शेतकऱ्याच्या कुटुंबास तत्काळ मदत मिळावी, तसेच घरकूल योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांंचे निवेदन भुजबळ यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुवर्णा दोंदे, लाखलगावच्या सरपंच सुरेखा वलवे, उपसरपंच आत्माराम दाते, विकास जाधव, अनिल कांडेकर, कैलास वलवे, संतोष मेहेंदळे, संजय कांडेकर, तुषार कांडेकर यांच्यासह शिलापूरचे राजू महाले, ऋत्विक महाले व ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
210321\21nsk_13_21032021_13.jpg
===Caption===
फोटो- लाखलगाव, शिलापूरच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना देऊन सत्कार करतांना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुवर्णा दोंदे, सरपंच सुरेखा वलवे, उपसरपंच आत्माराम दाते, विकास जाधव आदी मान्यवर.