ऑनलाइन शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी कारवाईसाठी पोलीस महानिरीक्षकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 07:36 PM2021-02-03T19:36:10+5:302021-02-03T19:36:43+5:30
दिंडोरी : ऑनलाइन शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला असून सदर दोषींवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेतर्फे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना निवेदन देण्यात आले.
दिंडोरी : ऑनलाइन शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला असून सदर दोषींवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेतर्फे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ३२० विद्यार्थ्यांच्या झालेल्या शिष्यवृत्तीतील ऑनलाइन घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी कठोर कारवाई व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व ते हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत यासाठी योग्य कारवाई व्हावी असे निवेदनाद्वारे दिघावकर यांना सांगण्यात आले. त्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे, मोहन वाघेरे, शशिकांत शार्दुल, निकेतन जाधव, गोकुळ शिंदे, भूषण पवार आदी उपस्थित होते.