प्रबोधिनीच्या खो-खो खेळाडूंकडून क्रीडा राज्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:01+5:302020-12-22T04:14:01+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो संघटनेने आज नाशिक येथे राज्य क्रीडामंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यात कार्यरत ...

Statement from Kho-Kho players of Prabodhini to the Minister of State for Sports | प्रबोधिनीच्या खो-खो खेळाडूंकडून क्रीडा राज्यमंत्र्यांना निवेदन

प्रबोधिनीच्या खो-खो खेळाडूंकडून क्रीडा राज्यमंत्र्यांना निवेदन

Next

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो संघटनेने आज नाशिक येथे राज्य क्रीडामंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यात कार्यरत खो-खो प्रबोधिनीला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे अनिवासी खो-खो प्रबोधिनी म्हणून मान्यता देण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले .

नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे गेल्या ३ वर्षांपासून आदिवासी खेळाडूंसाठी भारतातील पहिली निवासी खो-खो प्रबोधिनी चालविण्यात येत आहे. या प्रबोधिनीत ३६ मुली व १६ मुलांचा समावेश आहे . कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय हितचिंतक व स्नेही जनांकडून या प्रबोधिनीचा खर्च करण्यात येत आहे. याप्रसंगी सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात या मुलींना नाशकात आणून त्यांच्या ऑफलाइन शिक्षणाची सोय केल्याबद्दल संघटनेचे राज्य क्रीडामंत्री अदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले. या प्रबोधिनीला शासकीय स्तरावरून योग्य ती मदत दिली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मुलींसाठी बनवलेल्या विशेष सुरक्षा किटची त्यांनी आस्थेने चौकशी केली व पुढील भेटीत तुम्हा सर्वांना तुमच्या प्रबोधिनीत भेटायला येईन, अशी ग्वाही दिली. सर्व खेळाडूंची त्यांनी ओळख करून घेतली व प्रबोधिनीतील दहावीची परीक्षा देऊन ८० टक्के गुण मिळवणाऱ्या कौशल्या पवार व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खो-खो खेळाडू निशा वैजल, सोनाली पवार व मनीषा पडेर यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी संघटनेचे सचिव उमेश आटवणे, सहसचिव कांतीलाल महाले व दत्ता गुंजाळ, प्रशिक्षिका गीतांजली सावळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन निरंतर आदी उपस्थित होते.

Web Title: Statement from Kho-Kho players of Prabodhini to the Minister of State for Sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.