मालेगाव भाजप व्यापार आघाडीचे प्रांतांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:34+5:302021-03-13T04:27:34+5:30
भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तर महाराष्ट्र व्यापार आघाडीप्रमुख नितीन पोफळे, भाजप अध्यक्ष मदन गायकवाड, अध्यक्ष प्रकाश सुराणा, ...
भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तर महाराष्ट्र व्यापार आघाडीप्रमुख नितीन पोफळे, भाजप अध्यक्ष मदन गायकवाड, अध्यक्ष प्रकाश सुराणा, सरचिटणीस बालचंद छाजेड यांचा शिष्टमंडळात समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर, ता. श्रीरामपूर येथील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे सुमारे आठ दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील व्यापार क्षेत्रात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी व सहभागी दोषी व्यक्तींचा त्वरित तपास करावा. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून, आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी रूपेश कांकरिया, उपाध्यक्ष पारस अगरवाल, नीरज खंडेलवाल, सचिव सौरभ कोतकर, रामचंद्र जेधे, सुरेंद्र पहाडे आदी व्यापारी उपस्थित होते.