येवल्यात मराठा समाजाचे तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:04 PM2020-09-14T18:04:54+5:302020-09-15T01:24:37+5:30

येवला : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरूणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाने स्विकारावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार रोहिदास वारूळे यांना देण्यात आले.

Statement of Maratha community to Tehsildar in Yeola | येवल्यात मराठा समाजाचे तहसिलदारांना निवेदन

येवल्यात मराठा समाजाचे तहसिलदारांना निवेदन

Next
ठळक मुद्दे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरूणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाने स्विकारावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार रोहिदास वारूळे यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रांताधिकारी सोपान कासार यांनाही सदर निवेदन देण्यात आले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे, सारथी शिक्षण संस्था त्वरीत सुरू करावी, अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून महामंडळासाठी ५०० कोटी निधीची तरतूद करावी, चालू शैक्षणिक वर्षाची सर्व विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फी राज्य शासनाने भरावी, येवला तालुक्यात मराठा समाजासाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे, येवला शहरातील शिव स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे आदी मागण्याही सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संजय सोमासे, निंबाजी फरताळे, रविंद्र शेळके, सुदाम पडवळ, आदित्य नाईक, चंद्रमोहन मोरे, प्रविण निकम, सागर नाईकवाडे, गणेश गायकवाड, नितीन गायकवाड, अनिकेत गायकवाड, किशोर कोंढरे, प्रविण मिटके, महेश मोरे, गोकुळ आहेर, गणेश बोळीज, हेमंत शेळके, कोंडाजी कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

Web Title: Statement of Maratha community to Tehsildar in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.