देवळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:46 PM2020-09-12T21:46:16+5:302020-09-13T00:05:22+5:30
देवळा : राज्य शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून तीन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
देवळा : राज्य शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून तीन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबततहसीलदार दत्तात्रय शेजुळ, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.निवेदनाचा आशय असा, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची याचिका फेटाळल्याने समाजातील तरुणांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे समाजावर जो अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनविर्चार याचिका दाखल करावी. त्यापूर्वी विधिमंडळचे विशेष अधिवेशन बोलावून वटहुकूम काढून समाजाला न्याय द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर तालुका समन्वयक पंकज आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, संभाजी आहेर, खुंटेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पगार, गटनेते जितेंद्र आहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत आहेर, बाळासाहेब आहेर, दिलीप आहेर, अशोक आहेर, योगेश आहेर, मिलिंद पगार, बाबाजी पवार, मिलेश निकम आदींसह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.