संचमान्यतेनुसार अतिरिक्त ग्रंथपाल ठरविण्यास विरोध ; शिक्षणमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 03:17 PM2020-06-07T15:17:23+5:302020-06-07T15:24:18+5:30
सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले जात असल्याने अर्धवेळ व अतिरिक्त पूर्णवेळ हे ग्रंथपाल अस्वस्थ झाले आहे.
नाशिक : राज्यातील खाजगी शाळांतील ग्रंथपालांना गेल्या अनेक वषार्पांसून विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले जात असल्याने अर्धवेळ व अतिरिक्त पूर्णवेळ हे ग्रंथपाल अस्वस्थ झाले असून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाºया ग्रंथपालांना अतिरिक्त न ठरवता कार्यरत पदावरच कायम देवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय विभागाने केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेत्तर आकृतीबंध दि.२८ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयात ग्रंथपाल पदाच्या मंजुरीसाठी अन्य शिक्षकेतर पदांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच एक हजार विद्यार्थी संख्येच्या निकषामुळे कार्यरत ग्रंथपालांपैकी अनेक ग्रंथपाल अतिरिक्त दिसत असून त्यांचे समायोजन झाले नाही तर अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याचा शासन निर्णय दि. १/९/२०१८ च्या कार्यवाहीस अडचणी निर्माण होतील. शिक्षकेतर आकृतीबंधात लिपिक पदासाठी पाचवीची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली मात्र याच वगार्ची विद्यार्थी संख्या ग्रंथपाल पदासाठी ग्राह्य धरलेली नाही. त्यामुळे ही बाब ग्रंथपाल पदावर अन्यायकारक ठरणारी असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय विभागाने शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून देतानाच संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाºया ग्रंथपालांना अतिरिक्त न ठरवता कार्यरत पदावरच कायम देवण्याची मागणी केली आहे.