मनसेकडून सार्वजनिकबांधकाम विभागाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 03:59 PM2020-08-31T15:59:01+5:302020-08-31T16:02:42+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या रस्त्यांच्या दुरु स्ती कामाला लवकर सुरूवात करण्यात यावी, या संदर्भात इगतपुरी तालुका महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Statement from MNS to Public Works Department | मनसेकडून सार्वजनिकबांधकाम विभागाला निवेदन

इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था.

Next
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील रस्त्याची दुरूस्ती तात्काळ करण्याची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या रस्त्यांच्या दुरु स्ती कामाला लवकर सुरूवात करण्यात यावी, या संदर्भात इगतपुरी तालुका महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नांदूरवैद्य - अस्वली - मुंढेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाला व आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून वाहन चालवितांना दमछाक होत आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील दोन महामार्गांना जोडलेला आणि मुंबईकडून नाशिक रोड, देवळाली, भगूरकडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता म्हणून मुंढेगाव-अस्वली स्टेशन-भगूर या राज्यमार्गावर सध्या खड्यांचे साम्राज्य दिसत आहे. घोटी -सिन्नर या महामार्गाची देखील पावसाळ्यात वाट लागल्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच वाडीव-हे - आहुर्ली - सांजेगाव या रस्त्याची देखील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दुरवस्था झाली आहे. गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींमध्ये येणाऱ्या कामगारांना राञी अपराञी रोजगारासाठी यावे लागते आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याला अनेक वर्षांपासून पथदिप नसल्यामुळे गोंदे येथील औद्योगिक वसाहतीत कामगार रात्रीच्या वेळी कामाला जात येत असल्यामुळे या ठिकाणी पथिदपांची सोय करण्यात यावी अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या रस्त्याच्या संदर्भात संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देवून तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष आत्माराम मते तसेच विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Statement from MNS to Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.