मुस्लीम संघर्ष समितीचे भुजबळांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:15 AM2020-12-19T01:15:37+5:302020-12-19T01:16:10+5:30

मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Statement of Muslim Struggle Committee to Bhujbal | मुस्लीम संघर्ष समितीचे भुजबळांना निवेदन

मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी अजिज पठाण, पदाधिकारी मुश्ताक शेख, इब्राहिम अत्तार, जाकीर शेख, मुख्तार शेख, कय्युम शेख, मुख्तार शेख आदी

Next

नाशिक : मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिमांचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण कायम करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लीम विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, सारथी संस्थेच्या आधारावर मुस्लीम समाजासाठी संस्था स्थापन करण्यात यावी त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मुस्लीम युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

 

 

 

            यावेळी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजिज पठाण, पदाधिकारी मुशताक शेख, इब्राहिम अत्तार, जाकीर शेख, मुख्तार शेख, कय्युम शेख, मुख्तार शेख, इम्तियाज पिजार्स आदी उपस्थित होते.

 

Web Title: Statement of Muslim Struggle Committee to Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.