नांदगावी शिक्षक भारतीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:58 PM2020-07-03T21:58:39+5:302020-07-04T00:32:37+5:30
राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले.
नांदगाव : राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले.
निवेदनात म्हटले आहे, कोरोनाकाळात आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरू करावा, आॅनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्यावीत, विनाअनुदानित व रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, कोविड ड्यूटीवर असताना मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सॅनिटायझेशन करावे आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, जयवंत भाबड, संजय पैठणकर, नवनाथ गिते, परशराम शेळके, प्रल्हाद काकळीज, गणेश इनामदार, कांतीलाल जाधव संदीप यमगर, विलास काळे, शिवाजी कादीकर, संतोष चोळके, शरद पवार आदी उपस्थित होते.