मांजाबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:03+5:302021-01-04T04:13:03+5:30

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश न्याहादे यांना दिलेल्या निवेदनात आघाडीने म्हटले आहे की, नायलॉन मांज्यांचा सर्रास वापर केला ...

Statement by the Nationalist Women's Front on cats | मांजाबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदन

मांजाबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदन

Next

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक गणेश न्याहादे यांना दिलेल्या निवेदनात आघाडीने म्हटले आहे की, नायलॉन मांज्यांचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे पक्षी, नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात शहरात एका महिलेला मांजामुळे आपला जीव गमवावा लागला. मकरसंक्रांती निमित्ताने अनेक पतंगप्रेमी या नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवतात. त्यामुळे येत्या काळात या मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या मांजाची विक्री व वापर करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रमिला चव्हाण, निर्मला गांगुर्डे, सीमा पंडित, मीना केदारे, गायत्री धकांडे, पुष्पवती जगताप, सविता येलमाने, सानिया येलमाने, रेखा जाधव, शांताबाई सोनवणे, अनिता तायडे, उषा वाळके आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Statement by the Nationalist Women's Front on cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.