इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:55 IST2021-05-18T22:01:14+5:302021-05-19T00:55:39+5:30
मनमाड : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

मनमाड येथे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देताना योगेश पाटील, अमोल गांगुर्डे, सादिक पठाण, भारती देशमुख, विठ्ठल नलावडे आदी.
मनमाड : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
इंधन व रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य माणूस व शेतकरी भरडला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीने पेट्रोल पंपावर वाहन धारकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, शहराध्यक्ष सादिक पठाण, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, भारती देशमुख, विठ्ठल नलावडे, हबीब शेख,रईस फारुकी, अक्षय देशमुख, संदीप जगताप आदी उपस्थित होते.