घोटीच्या येथील नाभिक बांधवांचे प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 08:51 PM2020-06-13T20:51:08+5:302020-06-14T01:35:29+5:30

नांदूरवैद्य : कोरोनामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले असून, गेल्या मार्च महिन्यापासून सलून दुकाने बंद असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण ...

Statement of the nuclear brothers at Ghoti to the administration | घोटीच्या येथील नाभिक बांधवांचे प्रशासनास निवेदन

घोटीच्या येथील नाभिक बांधवांचे प्रशासनास निवेदन

Next

नांदूरवैद्य : कोरोनामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले असून, गेल्या मार्च महिन्यापासून सलून दुकाने बंद असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकाने उघडू द्या नाही तर मरणाला कवटाळण्याची परवानगी द्या, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फित लावून निषेध नोंदविण्यात आला असून, तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर कडवे, वाल्मीक रायकर, अ‍ॅड. सुनील कोरडे, कांता सूर्यवंशी, नारायण शिंदे, प्रकाश कोरडे, संजय बिडवे, प्रेमचंद गायकवाड, सोमनाथ कोरडे, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश जाधव, महेश कोरडे, अंकुश तुपे, प्रदीप बिडवे, याकूब खलिफा, संतोष अंबेकर आदी उपस्थित होते.

-------------------------------------------
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्यूटिपार्लर व्यवसाय बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, रोजचे दैनंदिन खर्च, घरखर्च व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी व आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Statement of the nuclear brothers at Ghoti to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक