राज्यात पोलीसभरतीसाठी तपस्या फोरमचे अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 08:16 PM2021-03-22T20:16:35+5:302021-03-22T20:18:15+5:30

सायखेडा : राज्यातील गत तीन वर्षांपासून बंद असलेली पोलीसभरतीची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी तपस्या फोरम आणि युवक यांच्या वतीने सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.

Statement to the officers of Tapasya Forum for Police Recruitment in the State | राज्यात पोलीसभरतीसाठी तपस्या फोरमचे अधिकाऱ्यांना निवेदन

राज्यात रखडलेली पोलीसभरती तत्काळ करावी, यासंदर्भात पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देताना किरण सानप व इतर.

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या तीन वर्षांपासून राज्यात पोलीसभरती रखडलेली

सायखेडा : राज्यातील गत तीन वर्षांपासून बंद असलेली पोलीसभरतीची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी तपस्या फोरम आणि युवक यांच्या वतीने सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात पोलीसभरती रखडलेली आहे. दोन सरकारे बदलली पण पोलीसभरतीला मुहूर्त सापडेना. पोलीसभरती हा ग्रामीण युवकांसाठी सर्वात मोठा रोजगार असतो. तीन वर्षांपासून भरतीच्या एकापाठोपाठ केवळ घोषणांमुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
पोलीसभरती हा केवळ रोजगार नसून गोरगरिबांच्या जगण्याचे साधन आहे. त्यांच्या भावनेचा सरकारने आदर करावा. नोकरी नाही, शेतमालाला भाव नाही, अशा विवंचनेत तरुण सापडलेला आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.

सरकारने वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेले उद्योगधंदे यांचा परिपाठ पाहता युवक आणि गोरगरिबांच्या भावनेचा आदर करीत पोलीसभरती तत्काळ सुरू करावी. तीन वर्षांत ज्यांचं वय वाढलं त्यांना एक संधी द्यावी व भरती प्रक्रिया स्पष्ट करावी.
- किरण सानप, अध्यक्ष, तपस्या फोरम.

 

Web Title: Statement to the officers of Tapasya Forum for Police Recruitment in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.