पोलीस पाटील संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 03:41 PM2020-08-21T15:41:15+5:302020-08-21T15:41:33+5:30
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्हा यांचे वतीने पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित व प्रमुख मागण्याचे निवेदन विधानसभा उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली.
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्हा यांचे वतीने पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित व प्रमुख मागण्याचे निवेदन विधानसभा उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली. निवेदनात नमुद केल्यानुसार पोलीस पाटील यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यात नागपूर,जळगाव या जिल्हात जे पोलीस पाटील कोविड १९ विषाणू साथ रोगाने सेवा बजावित असताना चार पोलीस पाटील मरण पावले आहेत. त्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपये विमा कवच मिळावे, पोलीस पाटीलांचे मानधन महिन्याचे महिन्याला मिळावे, सर्व पोलीस पाटील यांना पन्नास लाख रुपये विमा कवच मिळावे, आणि तसा शासन निर्णय करावा, पोलीस पाटील यांचे वय ६० वर्ष वरून ६५ वर्ष करावे, जे पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना कोविड साथ असेपर्यंत सेवा निवृत्त करू नये, सर्व तालुक्यात शासनाने पोलीस पाटील भवन बांधून द्यावे, दिंडोरी तालुक्यातील अधिवेशनसाठी नागपूर येथे जात असताना जे आठ पोलीस पाटील अपघाताने मरण पावले त्यांच्या वारसांना सेवेत घ्यावे, किंवा सानुग्रह अनुदान देण्यात यावे, ज्या पोलीस पाटील जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागी पुन्हा घरातील वारसांना प्राधान्य देण्यात यावे,अशा विविध प्रमुख मागण्यांचा यात समावेश होता. चर्चेवेळी झिरवाळ यांनी सांगितले की, राज्यातील सर्वच पोलीस पाटील यांच्या मागण्या बाबत मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री, महसूलमंत्री यांचे सोबत सविस्तर चर्चा करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. यावेळी चिंतामण पाटील मोरे, गांगुर्डे पाटील, भाऊराव ठेपने, शंकर तुंगार, मच्छीन्द्र खातळे, सचिव कैलास फोकणे, ज्ञानेश्वर धोंगडे, मनीषा ब-हे, ललिता शिंदे लखन भोर, अनिल जाधव, शैला नाठे, मनोहर जाधव, संजय धात्रक, प्रकाश रोंगटे व आदींनी मागणी केली आहे.