नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 PM2021-06-16T16:45:00+5:302021-06-16T16:46:38+5:30
देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, तत्कालिन ग्रामपंचायतींचे नवनिर्मित नगर परीषद व नगरपंचायतींमध्ये रूपांतर होऊन सहा वर्ष झालेली आहेत, परंतु शासनाकडून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्ती, लाभ आदी मागण्या प्रलंबित आहेत तत्कालिन ग्रामपंचायत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतमध्ये सरसकट समायोजन करण्यात यावे, तसेच त्यांची जुनी मागील सेवा ग्राहय धरून पेन्शन लागू करण्यात यावी, पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे, सफाई विभागातील ठेका पध्दत रद्द करण्यात येऊन सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे तसेच वारसा हक्काने त्याच्या वारसास नोकरीत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व अर्जीत रजेचा लाभ मिळावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा सदस्य सुधाकर आहेर, तालुकाध्यक्ष सुरेश आहेर, वसंत आहेर, दत्तात्रेय बच्छाव, माणिक आहेर, सागर बच्छाव, अनिता साळुंके, हौसाबाई साळुंके, योगेश आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या श्रीमती निलिमा आहेर यावेळी उपस्थित होत्या.
नवनिर्मित नगरपंचायत व नगर परीषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या हया कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे.
_ निलिमा आहेर, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस