कांदा निर्यात बंदीविरोधात पेठ कॉग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 05:07 PM2020-09-18T17:07:57+5:302020-09-18T17:08:33+5:30
पेठ : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर बंदी घालून शेतकर्यांची निराशा केली असल्याने या निर्णयाचा फेरविचार करून निर्यात बंदी ऊठवावी अशी मागणी पेठ तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे.
पेठ : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर बंदी घालून शेतकर्यांची निराशा केली असल्याने या निर्णयाचा फेरविचार करून निर्यात बंदी ऊठवावी अशी मागणी पेठ तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार संदिप भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्यांनी खुप कष्टाने पिकवलेल्या कांद्याला दोन पैसे भाव मिळाला तर शासनाने लगेच निर्यात बंदी करून शेतकर्यांवर अन्याय केला असून या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब शेख, विलास जाधव, सागर सूबंध, नदीम शेख, अब्बा निर्भवने, प्रशांत हाडळ, चिंतामण बोंबले, रु क्मिणी गाडर आदी उपस्थित होते.