सटाण्यात व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 10:57 PM2021-08-14T22:57:22+5:302021-08-14T23:02:32+5:30
सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या गरिबांवरच टाळेबंदी का, अशी संतप्त मागणी माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील एका शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शासनाने व प्रशासनाद्वारे राज्यात अनेक निर्बंध ठिकठिकाणी शिथिल करणे सुरू केले आहे, पण आठवडे बाजारातील हातावर पोट भरण्यासाठी बाजाराचा सहारा घेऊन आपली गुजराण करणारे गरीब व छोटे व्यावसायिक यांच्यावर मात्र, वक्रदृष्टी कायम ठेवली असून, अद्यापही आठवडे बाजाराला प्रशासनाने परवानगी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर माजी नगरसेवक छोटू सोनवणे, राजाराम पवार, श्रीपाद कायस्थ, नीलेश भामरे, मधुकर जाधव, गौरव मेटकर, अरुण अंधारे आदी व्यावसायिकांच्या सह्या आहेत.