प्रहार संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:14 PM2020-10-08T19:14:28+5:302020-10-09T01:03:13+5:30

येवला : तालुक्यातील विविध समस्यांबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन गाºहाणं मांडले.

Statement of the Prahar Association to the Inspector General of Police | प्रहार संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

प्रहार संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयास्पद मृत्यू होऊन दोन वर्ष होऊनही अजून शवविच्छेदन अहवाल व मृत्यू दाखला मिळू शकलेला नाही.

येवला : तालुक्यातील विविध समस्यांबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन गाºहाणं मांडले.
तालुक्यातील मानोरी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान दिगंबर शेळके यांचा संशयास्पद मृत्यू होऊन दोन वर्ष होऊनही अजून शवविच्छेदन अहवाल व मृत्यू दाखला मिळू शकलेला नाही. मुरु मी गावात दीड कोटींचा भ्रष्टाचार उघड होऊनही वर्ष उलटून गेले तरी अजून तपासात प्रगती नाही परिणामी भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळत आहे. तसेच अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकºयांची फसवणूक करून दोन वर्ष उलटले तरीही शेतकºयांचे कष्टकºयांचे निम्मे पैसे मिळालेले नाहीत. या तीनही बाबींचा प्रहार सातत्याने पाठपुरावा करत असून, दाद मिळत नसल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची प्रहारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन गाºहाणं मांडले.
दरम्यान, दिघावकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची हमी देत शेतकºयांची फसवणूक करणारांना सोडणार नसल्याची ग्वाही यावेळी दिली. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, देवळा तालुका उपाध्यक्ष हरशिंग ठोके, संघटक किरण चरमळ, सरचिटणीस सागर गायकवाड उपस्थित होते.
 

 

Web Title: Statement of the Prahar Association to the Inspector General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.