सिन्नरला शिक्षक समितीतर्फे प्रातांधिकार्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:04 PM2021-01-13T18:04:53+5:302021-01-13T18:05:21+5:30
सिन्नर : दि. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना शाश्वत अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे करण्यात आली.
शासनाने पेन्शन नाकारली आहे, त्यांना मूळची पेन्शन लागू होण्यासाठीच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सहभाग हे संघटनात्मक कर्तव्य आहे. शासन सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत समिती लढ्यात सक्रिय राहणार असून, लढ्याची जाणीव राहण्यासाठी प्रांत, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीचे राज्य संघटक नंदू आव्हाड, जिल्हा प्रतिनिधी संदीप काकड, अध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष विठ्ठल सानप, साहेबराव बोर्हाडे, किरण हासे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.