दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत चांदवड प्रशासनाकडे निषेधाचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:34 PM2020-07-11T20:34:29+5:302020-07-12T02:04:31+5:30
चांदवड : चांदवड तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष महावीर संकलेचा, सिद्धार्थ केदारे, उमेश जाधव, अर्चना खरे, रवींद्र जाधव, पांडुरंग भंडागे, प्रमोद जाधव, प्रवीण साळवे, विकास जाधव, सिंधूताई लोखंडे, विशाल जाधव, जितेंद्र अहिरे, अतुल शेजवळ, रुपेश जाधव, मुकेश जाधव, मच्छिंद्र सूर्यवंशी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. निवेदनात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ११ जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहिदांना अभिवादन करून महाराष्टÑ राज्यात व देशात समाजावर वाढणाऱ्या व होणाºया अन्याय व अत्याचारविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे आघाडी सरकार शासनस्तरावर अपयशी ठरल्याकारणाने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करून ‘राजगृह’वर झालेल्या तोडफोडीचा चांदवड तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला. या बाबीची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.