इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:02+5:302020-12-15T04:31:02+5:30

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलची शंभर रुपयांपर्यंत दरवाढ होऊ पाहत आहे, त्याचप्रमाणे ...

Statement to provinces protesting fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन

Next

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलची शंभर रुपयांपर्यंत दरवाढ होऊ पाहत आहे, त्याचप्रमाणे डिझेलचे दरही वाढत आहेत. सर्वसामान्य जनता आधीच कोरोना या महामारीमुळे त्रस्त आहेत. जगात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे सामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. आता कुठे लॉकडाऊन खुला केल्यामुळे सामान्य जनता रोजगाराचे साधन उपलब्ध करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहे. अशावेळी पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

हातावर काम करणारे मजूर, कामगार व सामान्य जनता इंधनवाढीमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाई भरमसाठ वाढलेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रमोद शुक्ला, तालुका प्रमुख संजय दुसाने, शहरप्रमुख श्रीराम मिस्त्री, उपमहापौर निलेश आहेर, संगीता चव्हाण, छाया शेवाळे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Statement to provinces protesting fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.