येवल्यातील स्वच्छतेबाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:15 PM2020-06-17T21:15:05+5:302020-06-18T00:31:54+5:30
येवला : कोरोनाने शहरात थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छतेचा कळस झाला असून, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षा वाºयावर सोडून कामात दिरंगाई व कुचराई करणाºया नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने करण्यात आली आहे
येवला : कोरोनाने शहरात थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छतेचा कळस झाला असून, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षा वाºयावर सोडून कामात दिरंगाई व कुचराई करणाºया नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अकबर शाह यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तक्रारींचे निवारण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष निसार
शेख, सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख, भाजपचे आनंद शिंदे, माजी नगरसेवक मुश्ताक शेख, मलिक शेख, मोहसीन शेख, अॅड. वसीम शेख, शकील शेख, शाकीर शेख आदी उपस्थित होते.