पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:43 PM2020-08-25T17:43:38+5:302020-08-25T17:44:55+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे.

Statement of Ration Beneficiaries at Pimpalgaon to Mandal Officers | पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपळगाव बसवंत येथे मंडल अधिकारी नीळकंठ उगले यांना निवेदन देताना देवीदास वाघ, रामदास गांगुर्डे, जितू वाघ,भावडू धुळे आदी. 

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारकडून आलेल्या धान्याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात करतात.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील म्हसोबा चौकातील तीन नंबरचे दुकानदार हे सतत धान्य वाटप करताना लाभार्थींना अरेरावीची भाषा बोलत गरिबीची थटा उडवतात. सरकारकडून आलेल्या धान्याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात करतात. शासनाने नेमून दिलेल्या वेळेत दुकानदेखील उघडत नसल्याने कोरोनाच्या या महामारीत व लॉकडाऊनच्या काळात अनके लाभार्थींना राशन घेण्यासाठी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते. या रेशन धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर देवीदास वाघ, दत्तू झनकर, पप्पू वाघमारे, जितू वाघ,भावडू गांगुर्डे, रामदास गांगुर्डे, विक्रम धाडीवाल, माणिक वाघ, ज्ञानेश्वर लोखंडे, प्लवेश भोये आदीच्या स्वाक्षºया आहेत.
 

Web Title: Statement of Ration Beneficiaries at Pimpalgaon to Mandal Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.